Shreya Maskar
मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने घालणे शुभ मानले जाते.
बाजारातही आता हलव्याचे दागिने खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग पाहायला मिळत आहे.
वेगवगळ्या प्रकारचे आणि कमी खर्चात तुम्हाला जर हलव्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर दादरला आवर्जून भेट द्या.
दादर मार्केट पारंपरिक गोष्टींच्या शॉपिंगसाठी ओळखले जाते.
बाजूबंद, हार, बांगड्या, नथ , कंबरपट्टा आणि मंगळसूत्र असे विविध दागिने येथे उपलब्ध आहेत.
लहान मुलांसाठी देखील येथे छोटे हलव्याचे दागिने पाहायला मिळतात.
तुम्हाला ५०-१०० रुपयांपासून येथे दागिने पाहायला मिळतील.
नव्या नवरीच्या मकर संक्रांती शॉपिंगसाठी दादर मार्केट बेस्ट ऑप्शन आहे.