Manasvi Choudhary
हिंदू धर्मात नवीन वर्षातील पहिला सण मकरसंक्रातीला विशेष महत्व आहे. मकरसंक्राती या सणाला घरोघरी पूजा केली जाते.
मकरसंक्राती या सणाला काळ्या रंगाचे नवीन वस्त्र परिधान केले जाते. तर या दिवशी लहान मुलांना देखील नवीन वस्त्र परिधान करतात.
पारंपारिक लूकमध्ये तुम्ही मुलांना मकरसंक्रातीनिमित्त काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता.
मकरसंक्रातीनिमित्त मुलांना काळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची धोती असा लूक करू शकता.
कुर्ती वर तुम्ही लहान मुलांसाठी नेहरू जॅकेट असा लूक निवडू शकता अत्यंत पारंपारिक लूक दिसेल.
काळ्या रंगाचे 'खण परकर-पोलकं' हा जुना पॅटर्न आहे. अत्यंत सुंदर दिसणारा हा लूक तुम्ही लहान मुलींसाठी निवडू शकता.
लहान मुलीसाठी खास नऊवारी साडी शिवून घेऊ शकता. हा अत्यंत मराठमोळा लूक दिसेल.
तुम्हाला पारंपरिक ऐवजी इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल, तर काळ्या कापडापासून फ्रॉक शिवू शकता.
बोरन्हाण करताना मुलांना खूप दागिने घातले असतात, त्यामुळे मुलांना कपडे जास्त घालू नका.