Manasvi Choudhary
काळा रंगाच्या साडीवर मॅचिंग ज्वेलरी घातल्यास लूक उठून दिसतो तुम्ही देखील यंदा मकरसंक्रातीनिमित्त खास लूक करू शकता.
काळ्या रंगाच्या साडीवर दागिने निवडताना ते उठून दिसतील असेच घ्यावे. मकरसंक्रातीनिमित्त तुम्ही देखील काळ्या साडीवर कानातले घेणार असाल तर खालील डिझाईन्स पाहा
तुम्ही जर पैठणी किंवा सिल्क साडी नेसणार असाल तर तुम्ही मोत्याचे झुमके किंवा कुड्या हे कानातले निवडू शकता.
खण किंवा कॉटन साडी वर तुम्ही खास ऑक्सिडाईज्ड कानातले परिधान करू शकता यामुळे लूक उठून दिसेल .
जर तुम्ही टिशू, नेट किंवा सिक्विन साडी परिधान करणार असाल तर तुम्ही चमकणारे हिरे किंवा पांढऱ्या खड्यांचे लांब कानातले निवडा.
जर तुम्ही मकर संक्रांतीसाठी काळी साडी नेसणार असाल, तर साखरेच्या हलव्यापासून बनवलेले पांढरे कानातले सर्वात जास्त उठावदार दिसतात.
रेशमी धाग्यांपासून किंवा कापडापासून बनवलेले हे कानातले दिसायला खूपच युनिक आणि वजनाला हलके असतात. यात हाताने नक्षीकाम केलेली असते.