Manasvi Choudhary
हिंदू धर्मात मकर संक्राती या सणाला काळी साडी नेसतात. या दिवशी काळ्या रंगाच्या साडीमध्ये महिलाचं सौंदर्य खुलतं
काळ्या रंगाच्या साडीच्या काही लेटेस्ट डिझाईन्स आज आपण या वेबस्टोरीतून पाहूया.
काळी पैठणी साडी हि महिलांची पहिली पसंती असते. काळ्या रंगाच्या पैठणी साडीवर नक्षीकाम केले असते यामुळे ती उठून दिसते.
खणाची साडी ही महाराष्ट्राची ओळख आहे. काळ्या खण साडीवर लाल किंवा पिवळ्या रंगाची काठ असते ही साडी नेसल्यावर खुप सुंदर दिसते.
काळी टिशू सिल्क साडी ही थोडी ट्रान्सपरंट आणि चमकणारी असते. साडीच्या पदरावर किंवा काठावर 'स्कॅलप' कटवर्क असते.
कॉटन साडी ही घालण्यास हलकी असते. हलकी असल्यामुळे ब्लॅक कॉटन साडी दिवसभर घालण्यासाठी योग्य आहे. रंगीबेरंगी ब्लाऊजसोबत तुम्ही साडी नेसू शकता.
रॉयल लूकसाठी ब्लॅक बनारसी साडी एक बेस्ट पर्याय आहे. जड ब्रोकेड डिझाइन आणि गोल्डन वर्क असलेली साडी संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी परफेक्ट दिसते.