Siddhi Hande
गौतमी देशपांडे ही मराठी मालिकाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे.
गौतमीने मालिकांसोबतच नाटकांमध्येही आपली छाप पाडली आहे.
गौतमी देशपांडे उत्तम गाणेदेखील गाते. ती नेहमी गाणे गातानाचे व्हिडिओ शेअर करत असते.
गौतमी देशपांडे ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची लहान बहीण आहे.गौतमीने बहिणीच्या पाऊलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात काम करायचे ठरवले.
गौतमीचा जन्म ३१ जानेवारी १९९३ रोजी झाला.
गौतमी सध्या ३२ वर्षांची आहे.
गौतमीने माझा होशील ना या मालिकेत काम केले होते. मालिकेतील तिच्या कामाचे आजही कौतुक होते.