Manasvi Choudhary
वास्तूशास्त्रात, घराचा मुख्यप्रवेशद्वार हा महत्वाचा मानला जातो. घराच्या दरवाज्यातून सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते.
घराचा मुख्यप्रवेशद्वारातून सुख- समृद्धी येत असते यासाठी वास्तुशास्त्रानुसार घराच्या दाराजवळ काही अशुभ गोष्टी करू नये.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दाराजवळ कोणत्या चुका करू नये हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
घराच्या दाराजवळ घाण, कचरा आणि इतर कोणतीही खराब वस्तू ठेव नये यामुळे आर्थिक संकट उद्भवू शकते.
घराच्या मुख्यदाराजवळच्या भिंती या खराब झालेल्या नसाव्यात. भितींवर जुन्या वस्तू, घाणेरडे काळे डाळ नसावेत याचा परिणाम घरावर होतो.
घरात दरवाज्यातून माता लक्ष्मी प्रवाश करते यामुळे घराच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ बूट, चप्पल ठेवणे टाळावे. घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यामुळे बाजूला स्टॅण्डवर बूट, चपला ठेवा.
घराचा मुख्य प्रवेश द्वाराजवळ कधीही अंधार करू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. घराच्या शेजारी, दाराजवळ दिवे लावा माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल.
घराचा दरवाजा हा तुटलेला, खराब झालेला नसावा. दरवाजा तुटलेला किंवा गंजलेला असल्यास त्याचा परिणाम सकारात्मक उर्जेवर होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.