Maida Effects on Health: जास्त प्रमाणात मैद्याचे पदार्थ खल्ल्याने शरिरात कोणते बदल होतात?

Shruti Vilas Kadam

वजन झपाट्याने वाढते

मैद्याचे पदार्थ पचायला कठीण असतात आणि त्यात फायबर नसल्यामुळे चरबी जलद साठते. त्यामुळे वजन वाढायला सुरुवात होते.

Maida Effects on Health

रक्तातील साखर अचानक वाढते

मैदा हे हाय-ग्लायसेमिक फूड असल्यामुळे रक्तातील शुगर लेव्हल पटकन वाढतात, ज्यामुळे डायबिटीजचा धोका वाढू शकतो.

Maida Effects on Health

पचनसंस्थेवर ताण येतो

फायबर कमी असल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, फुगीरपणा आणि ऍसिडिटी यांसारख्या समस्या दिसतात.

Maida Effects on Health

त्वचेवर मुरुम व पिंपल्स वाढतात

मैद्यामुळे शरीरात इन्सुलिन वाढते, ज्यामुळे त्वचेमध्ये तेलकटपणा वाढतो आणि मुरुम, ब्लॅकहेड्स वाढतात.

Maida Effects on Health

एनर्जी कमी होणे व थकवा

मैद्याचे पदार्थ रक्तातील साखर पटकन वाढवतात आणि तितक्याच वेगाने कमी करतात, त्यामुळे शरीरात सुस्ती, थकवा जाणवतो.

Maida Effects on Health | Saam Tv

कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता

मैदा प्रक्रिया केलेला असल्याने तो 'वाईट' LDL कोलेस्टेरॉल वाढवू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

Maida Effects on Health | google

रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे

मैद्यामध्ये आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे शरीराची इम्युनिटी कमी होते आणि आजारपण लवकर जडते.

Maida Effects on Health | Freepic

'या' अभिनेत्रीला दोन वेळचं जेवणही परवडत नव्हत; आज आहे इतक्या कोट्यवधी मालकीण

Actress Success | Saam tv
येथे क्लिक करा