कोमल दामुद्रे
माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो.
यंदा हा सण ८ मार्चला साजरा केला जाणार आहे. यादिवशी अनेकजण शंकराचे दर्शन घ्या
मुंबईत असे अनेक शिवमंदिरे आहेत ज्याविषयी बरेच लोकांना माहित नाही.
यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त मुंबईत असणाऱ्या प्रसिद्ध शिवमंदिरांना नक्की भेट द्या.
बाबुलनाथ मंदिर ८०० वर्षाहून अधिक जुने आहे. हे मंदिर गिरगाव चौपाटीजवळ छोट्या टेकडीवर वसलेले आहे.
वाळकेश्वर मंदिर किंवा बाणगंगा मंदिर हे मुंबई शहरामधील ऐतिहासिक मंदिर आहे. दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या वाळकेश्वर भागात आहे.
मुंबई लगत असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ठाणे जिल्ह्यातील वसलेलं अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिर आहे.