Mahashivratri Special Recipe: महाशिवरात्रीला बनवा साबुदाण्याचे थालीपीठ, झटपट बनणारी रेसिपी पाहा

कोमल दामुद्रे

महाशिवरात्री

महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही देखील उपवास ठेवला असेल तर साबुदाण्याचे थालीपीठ ट्राय करु शकता.

Sabudana Thalipeeth with Curd | yandex

साबुदाण्याचे थालीपीठ

साबुदाण्याचे थालीपीठ चवीला रुचकर आणि खुसखुशीत बनतात पाहूया रेसिपी

Sabudana Thalipeeth for upavas | yandex

साहित्य

२ वाटी भिजलेला साबुदाणा, ३ उकडलेले बटाटे, १ मोठा चमचा राजगिऱ्याचे पीठ, मिरच्या, जीरे, मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर, तूप आणि १ चमचा दाण्याचा कूट

Sabudana Thalipeeth ingredient | yandex

बटाटा मॅश करुन घ्या

सर्वात आधी भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये बटाटा मॅश करुन घालावा. नंतर दाण्याचा कूट राजगिरा पावडर, मिरची,जिरे, मीठ, साखर, कोथिंबीर घालून पीठ मळून घ्या.

Sabudana Thalipeeth fast recipe | yandex

पाणी शिंपडा

पीठ मळताना थोडसं पाणी शिंपडा. त्याचे छोटे गोळे करुन थालीपीठ थापा.

Sabudana Thalipeeth Recipe Step | yandex

थालीपीठ थापा

पाण्याच्या हाताने थापावेत नंतर त्याच्या मध्यभागी होल पाडावा.

Sabudana Thalipeeth recipe making | yandex

थालीपीठ भाजून घ्या

गॅसवर ठेवून कडेने तूप सोडून झाकण ठेवावे, दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत भाजून घ्यावे.

Sabudana Thalipeeth upvas recipe | yandex

सर्व्ह करा

हे थालीपीठ दही किंवा चटणीसोबत खाऊ शकतो.

Sabudana Thalipeeth with chutney | yandex

Next : महाशिवरात्रीला करा या रंगाचे वस्त्र परिधान, सदैव राहिल महादेवाची कृपा

Know About Mahashivratri 2024 Date Puja Time Which Color Clothes Should Be Worn | Saam Tv
येथे क्लिक करा