Sweet Potato Cutlet Recipe: महाशिवरात्रीनिमित्त उपवासाला बनवा रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

महाशिवरात्री

आज महाशिवरात्री हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाशिवरात्रीला शंकराची मनोभावे पूजा करून उपवासाचे व्रत पाळले जाते.

रताळे कटलेट

महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही रताळे खाऊ शकता. रताळे पासून तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने कटलेट बनवू शकता.

Sweet Potato Cutlet Recipe

पौष्टिक रेसिपी

पचायला हलके, चविष्ट आणि पोटभर नाश्ता म्हणून रताळ्याचे कटलेटे तुम्ही बनवू शकता. रताळ्याचे कटलेट कसे बनवायचे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Sweet Potato Cutlet Recipe

साहित्य

रताळ्याचे कटलेट बनवण्यासाठी रताळे, शेंगदाणा कूट, राजगिरी पीठ, हिरवी मिरची , जिरे, आले, सैंधव मीठ, कोथिंबीर, तूप किंवा तेल हे साहित्य घ्या.

Sweet Potato | yandex

रताळे उकडून घ्या

रताळे कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी एका कुकरमध्ये रताळे उकडून घ्या उकडलेल्या रताळ्याची साल काढू एका प्लेटमध्ये ठेवा.

Sweet Potato Cutlet Recipe | yandex

मिश्रण मिक्स करा

रताळा मॅश करून त्यात शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, जिरे, आले, मीठ, साखर आणि कोथिंबीर मिक्स करा. नंतर या संपूर्ण मिश्रमात राजगिरी पीठ मिक्स करा.

Sweet Potato Cutlet Recipe | yandex

कटलेट तयार करा

यानंतर हाताला थोडे तूप लावून तयार मिश्रणाचे छोटे गोळे करा आणि त्यांना हाताने दाबून चपटा किंवा गोल आकार द्या.

Sweet Potato Cutlet Recipe

कटलेट फ्राय करा

गॅसवर एक नॉन-स्टिक तवा गरम करा. त्यावर थोडे तूप किंवा तेल टाका. तयार केलेले कटलेट्स तव्यावर ठेवा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

Sweet Potato Cutlet Recipe

next: महाशिवरात्रीचा उपवास कधी व कसा सोडावा?

येथे क्लिक करा...