Manasvi Choudhary
महाशिवरात्री हा हिंदूचा सण आहे.
फेब्रुवारी - मार्चमध्ये महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.
यंदा २६ फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी महाशिवरात्री साजरी होणार आहे.
महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा केली जाते.
पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमुत्र, आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक घालतात.
दूध, दही, मध आणि साखप या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात.
धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पाढंरी फुले वाहून पूजा केली जाते.
महाशिवरात्रीला भाविक उपवास करतात यामध्ये दूध आणि फळे खाल्ली जातात.