Manasvi Choudhary
सणासुदीला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला पुरणपोळी आवडीने बनवली जाते.
पुरण पोळी खायला सर्वांनाच आवडते.
घरी पुरण पोळी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पुरण पोळी बनवण्यासाठी चणाडाळ, गूळ, जायफळ, साजूक तूप, मैदा, गव्हाचे पीठ, मीठ, हळद हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम चणाडाळ १ तास भिजत घालून कुकरमधे शिजवून घेतली.
नंतर गॅसवर कढईमध्ये डाळ आणि गूळ एकत्र करून सतत परतून घ्या नाहीतर डाळ तळाला लागून करपू शकते.
मिश्रण हळूहळू आटू लागले की त्यात वेलची पूड, जायफळ पूड,हळद घालून छान मिक्स करून घ्या.
स्मॅशरने पुरण मिक्स केल्यास पुर्ण छान मऊसूत होते. पुरण कोरडे झाले की गॅस बंद करून थंड करून घ्या. पुरण जाळीमधे बारीक करून घ्या. आणि फ्रिजमध्ये ठेवून द्या.
मिक्सिंग बाऊलमधे मैदा,गव्हाचे पीठ,मीठ, चिमूटभर भर हळद घालून छान मऊसूत पीठ मळून घ्या.
तयार पीठाचा गोळा घेऊन त्यात पुरण भरा आणि पुरणपोळी लाटून घ्या. तव्यावर पोळी छान खमंग खरपूस भाजून तूप लावून घ्या.