Shreya Maskar
महाशिवरात्रीला खास थंडाई बनवा.
थंडाई बनवण्यासाठी दूध, साखर, बदाम, केशर, गुलाबाच्या पाकळ्या, पाणी, बडीशेप, वेलची, खरबूजाच्या बिया आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
थंडाई बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध चांगले उकळून थंड करून घ्या.
यानंतर वेलची, खरबूजाच्या बिया, बदाम, गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवत ठेवा.
गुलाबाच्या पाकळ्यांच्या मिश्रणाची पेस्ट मिक्सरला वाटून घ्या.
तयार पेस्ट दुधात छान मिसळून घ्या.
आता दुधात साखर, ड्रायफ्रूट्स आणि केशर घाला.
अशाप्रकारे थंडगार थंडाई तयार झाली आहे.