Shreya Maskar
कोथिंबीर वडी बनवण्यासाठी कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, तांदळाचे पीठ, बाजरीचे पीठ, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, तीळ, ओवा, हळद, गरम मसाला, पाणी आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
आता एका बाऊलमध्ये चिरलेली कोथिंबीर, तांदळाचे पीठ, बाजरीचे पीठ, तीळ आणि ओवा टाकून मिक्स करून घ्या.
यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि तीळ टाका.
आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या.
एका ताटाला तेल लावून त्यात वडीचे पीठ पसरवून घ्या.
आता एका मोठ्या भांड्यात पाण्याला उकळी काढून त्यावर चाळणीत वडीचे ताट ठेवा.
१५-२० मिनिटे वड्या शिजल्यानंतर त्याचे काप करून पुदिन्याच्या चटणीसोबत खा.