Mahashivratri 2024 | प्रतिकाशी म्हणून ओळखली जातात कोकणातील 'ही' शिवमंदिरं

Shraddha Thik

काशी विश्वनाथ तीर्थक्षेत्र

भारताच्या उत्तरेला असलेलं काशी विश्वनाथ या तीर्थक्षेत्राला हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे.

Mahashivratri 2024 | Google

कुणकेश्वर

हापूस आंब्यासोबतच देवगडची आणखी ओळख सांगणारं तीर्थक्षेत्र म्हणजे कुणकेश्वर शिवमंदिर. हे मंदिर स्वयंभू असल्याने या मंदिराच्या किनाऱ्यावर पाच पांडवांनी देवगडच्या किनाऱ्यावर 21शिवलिंगाची स्थापना केली.

Kunkeshwar | Google

वेळणेश्वर

अथांग समुद्राची येणारी गाज, लाल माती आणि सोबतच नारळीच्या बागांमधून डोकावणारं कौलारू असे वेळणेश्वराचं प्राचीन मंदिर. तीन फुट लांबीची शिवपिंड त्यावर असलेला पाच फणांचा नाग अशी गाभाऱ्यातील शिवाची पिंड आहे.

Varaneshwar | Google

व्याडेश्वर मंदिर

गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात. व्याडेश्वर हे कोकणस्थ ब्राम्हण कुटुबांचं कुलदैवत मानलं जातं. मंदिराचं बांधकाम हे बाराव्या शतकातील असल्याचं म्हटलं जातं. व्याडी ऋषींच्या हस्ते स्थापना केलेली शिवपिंड म्हणजे व्याडेश्वर.

Vyadeshwar Temple | Google

मार्लेश्वर

रत्नागिरीच्या डोंगरावर वसलेला मारळ गावचा देव म्हणून मार्लेश्लर अशी येथील मंदिराची ओळख आहे. पावसाळ्यातील मार्लेश्वर परिसरात असलेल्या धबधब्यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात मार्लेश्वराला भेट देतात.

Marleshwar | Google

धूतपापेश्वर

राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावातील जागृत देवस्थान म्हणून धूतपापेश्वर मंदिराची ओळख आहे. डोंगरावरून येणारी मृडानी नदी मंदिराच्या सौंदर्यात भर घालते.

Dhootpapeshwar | Google

रामेश्वर मंदिर

आचऱ्यातील रामेश्वर मंदिराची उभारणी 1684 मध्ये करण्यात आली.तळकोकणातील बऱ्याच कुटुंबात रामेश्लराला पुजलं जातं.मालवण तालुक्यातील या मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात.

Rameshwar Temple | Google

Next : Alia Bhatt | 'राहा'ची मम्मी किती क्यूट! आलियाला पाहून 'जीव भुलला'

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt
येथे क्लिक करा...