Siddhi Hande
रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचा असा प्रश्न सर्व महिलांनाच पडलेला असतो. नाश्त्याला काहीतरी पौष्टिक पण चटपटीत पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला खास तिखट भाकरी बनवू शकतात. ह भाकरी खूप पौष्टिकदेखील असते.
कोथिंबीर, मिरची, आलं-लसूण पेस्ट, ओवा, जिरं, बाजरीचे पीठ, चणाडाळ पीठ, तेल
सर्वात आधी तुम्हाला कोथिंबीर धुवून एकदम बारीक चिरुन घ्यायची आहे.
यानंतर मिक्सरला आलं-लसूण, जिरं, मिरच्या बारीक वाटून घ्या.
यानंतर परातीत ही मिरचीची पेस्ट टाका. आता त्यावर बाजरीचे पीठ, चण्याचे पीठ टाका. यानंतर हे सर्व मिश्रण छान एकजीव करुन घ्या.
या पीठात पाणी टाकू नका. ते पीठ तसेच मिक्स करा. या पीठात तुम्ही थोडे तीळदेखील टाकू शकता.
यानंतर तुम्हाला एक पातळ कपडा घ्यायचा आहे. त्यावर हे पीठ बारीक थापून घ्या.
एका बाजूला तवा गरम करायला ठेवा. त्यावर तेल टाका. त्यावर ही भाकरी टाका.
यानंतर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. तिखट भाकरी खूप चविष्ट आणि पौष्टिक असते.