Misal Recipe: एकदम झणझणीत! गावरान स्टाईल मिसळ बनवण्याची सोपी रेसिपी

Siddhi Hande

मिसळ

मिसळ हा पदार्थ महाराष्ट्रातील प्रत्येक घरात बनला जातो. झणझणीत मिसळ ही सर्वांनाच आवडते.

Misal Recipe | Google

गरम मसाला

मिसळ बनवताना सर्वप्रथम गरम मसाला (खडा मसाला) कढईत भाजून घ्या. त्यात तीळ आणि जिरेदेखील भाजून घ्या.

Misal Recipe | Google

कांदा- खोबरे भाजून घ्या

हे मिश्रण मिक्समध्ये बारीक करुन घ्या. यानंतर कढईत खोबरे, कांदा भाजून घ्या.

Misal Recipe | Google

मिश्रण

भाजलेले खोबरे, कांदा, आले लसण पेस्ट, कोथिंबीर मिक्समध्ये बारीक करुन घ्या. त्यात गरम मसाल्याची पावडर टाका. त्यात थोडं पाणी टाकून मिक्स करा.

Misal Recipe | Google

फोडणी द्या

यानंतर एका मोठ्या कढईत तेल टाका.त्यात जिरं मोहरीची फोडणी द्या. त्यानंतर कांदा छान परतून घ्या.

Misal Recipe | Google

मटकी

यानंतर कढईत मोड आलेली मटकी टाकून मिक्स करा. त्यात लाल मिरची पावडर, मिसळ पावडर आणि घरी बनवलेला मसाला टाका.

Misal Recipe | Google

मिसळची रेसिपी

यानंतर मिश्रणात पाणी टाका. चवीनुसार मीठ टाका. मटकी शिजेपर्यंत मिसळ आटू द्या. ही मिसळ तुम्ही फरसाण, कांदा कोथिंबीर टाकून खाऊ शकतात.

Misal Recipe | Google

Next: घरच्या घरी 10 मिनिटांत बनवा चटपटीत वाटाणा- पोह्याचे कटलेट; रेसिपी वाचा

Cutlet Recipe | Google
येथे क्लिक करा