Manasvi Choudhary
महाराष्ट्रीयन स्टाईल थालीपीठ हे एक चवदार आणि पौष्टिक फ्लॅटब्रेड आहे.
भाजलेले कडधान्य आणि डाळी यांपासून बनवले जाते.
थालीपीठ हे महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आहे. थालीपीठ बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
थालीपीठ बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बाजरीचे पीठ, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट, भिजवलेले पोहे, कोथिंबीर, तीळ आणि ओवा हे साहित्य घ्या.
एका बाऊलमध्ये ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन हे चांगले मिक्स करा.
या मिश्रणात आले- लसूण पेस्ट, जिरा पावडर, हळद, धना पावडर घालून मिक्स करा.
यानंतर कांदा, मिरची आणि कोथिंबीर बारीक करून यामध्ये घाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
आता यामध्ये थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. नंतर बटर पेपरला तेल लावून यावर कनिकेचा गोल गोळा करा.
गोल हाताच्या सहाय्याने फिरवून तुम्हाला हवे त्या पद्धतीने फिरवून घ्या.
पातळ थालीपीठ गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये पसरवून घ्या.
दोन्हीबाजून तेल लावून सोनेरी रंग होईपर्यत भाजून घ्या.
नंतर एका प्लेटमध्ये तयार थालीपीठ चटणीसोबत सर्व्ह करा.