Chirote Recipe : घरच्या घरी बनवा खुसखुशीत आणि पातळ लेअर असलेले खमंग चिरोटे

Saam Tv

दिवाळी फराळ

दिवाळीला घरीच सिंपल पद्धतीने फराळ बनवा. चिरोटे हा गोड पदार्थ गावाकडे दिवाळीला बनवला जातो.

DIWALI FARAL | PINTEREST

जिभेवर विरघळणारे खुसखुशीत चिरोटे

अनेक थरांचे, हलकेफुलके आणि कुरकुरीत चिरोटे बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत

DIWALI FARAL | PINTEREST

साहित्य

२ कप मैदा, २ चमचे बारीक रवा, चुटकीभर मीठ, ३ चमचे कडकडीत गरम साजूक तूप, ३ चमचे कॉर्नफ्लोर, पिठीसाखर, वेलची पूड, तळावयासाठी तेल/तूप

DIWALI FARAL | PINTEREST

कणीक व साटा तयार करणे

मैद्यामध्ये रवा, मीठ आणि कडकडीत तुपाचे मोहन घालून नीट मिक्स करा. थोडे थोडे पाणी घालून घट्ट कणीक मळून १५ मिनिटे झाकून ठेवा. एका वाटीत तूप मऊ होईपर्यंत फेटून घ्या. त्यात कॉर्नफ्लोर मिक्स करून हलकी व क्रीमी पेस्ट तयार करा.

DIWALI FARAL | PINTEREST

थरांचे टप्पे

  • मळलेल्या कणकेच्या समान लाट्या करून पातळ पोळ्या लाटा.

  • एका पोळीवर साटा पसरवा, त्यावर दुसरी पोळी ठेवून पुन्हा साटा लावा.३ पोळ्या रचून झाल्यावर त्याचा घट्ट रोल तयार करा.

  • रोलचे १-१ इंचाचे छोटे तुकडे कापून हलक्या हाताने थोडे लाटा.

DIWALI FARAL | PNTEREST

तळण्याची योग्य पद्धत

तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करून चिरोटे मंद आचेवरच तळा. यामुळे पदर व्यवस्थित सुटतात.चिरोटे जास्त लाल करू नका. गुलाबी किंवा पांढरट-सोनेरी रंगावर तळा.

DIWALI FARAL | PINTEREST

फिनिशिंग

तळलेले चिरोटे गरम असतानाच त्यावर पिठीसाखर आणि वेलची पूड भुरभुरा. पाकातले चिरोटे हवे असल्यास साखरेचा १ तरी पाक करून त्यात बुडवून काढा.

DIWALI FARAL | PINTEREST

महत्त्वाच्या टिप्स

  • कणकेत गरम तुपाचे मोहन घातल्याने चिरोटे छान खुसखुशीत होतात.

  • पोळीची गुंडाळी करताना हवा राहणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे चिरोटे सुटत नाहीत.

  • साटा तयार करताना तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लोर वापरल्यास जास्त लेयर्स सुटतात.

DIWALI FARAL | PINTEREST

स्टोअर करा

तुमचे खुसखुशीत चिरोटे तयार आहेत. पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवून १५-२० दिवस या चविष्ट फराळाचा आनंद घ्या.

DIWALI FARAL | PINTEREST

NEXT : दिवाळीला फराळात बनवा स्वादिष्ट दाणेदार बूंदीचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

Boondi Laddu Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा