Manasvi Choudhary
महाराष्ट्रीयन प्रसिद्ध पदार्थ्यांपैकी एक म्हणजे कोथिंबीर वडी. श्रावण महिन्यात घराघरांत कोथिंबीर वडी बनवली जाते.
तुम्हालाही घरी हॉटेलसारखी कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवायची असेल तर रेसिपी अत्यंत सोपी आहे.
कोथिंबीर वडी बनवण्यासाठी कोथिंबीर, बेसन पीठ. तांदळाचे पीठ, ओवा, हळद, मसाला, हिंग, आले- लसूण पेस्ट, तेल, मीठ हे साहित्य घ्या.
कोथिंबीरची वडी रेसिपी करण्यासाठी सर्वात आधी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या.
एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ घ्या. त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, ओवा, हळद, लाल तिखट, धने-जिरे पूड, तीळ आणि चवीनुसार मीठ घाला
शेवटी यामध्ये १ छोटा चमचा गरम तेल आणि लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घ्या.
तयार मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करा.
एका कुकरच्या एका भांड्यात थोडे पाणी दुसऱ्या बाजूला चाठणी ठेवून कोथिंबीर वडी उकडून घ्या.
वड्या उकडून झाल्यावर त्या चौकोनी कापून घ्या. गॅसवर कढईत गरम तेलामध्ये कोथिंबीर वडी तळून घ्या.