श्रावणात बनवा अळूच्या पानांची कुरकुरीत वडी; एकदा खाल तर खातच राहाल

Manasvi Choudhary

अळुची वडी

श्रावणात पारंपारिक पदार्थ बनवले जातात. तुम्हालाही काहीतरी चमचमीत, खमंग खाण्याची आवड असेल तर तुम्ही अळूच्या पानांची वडी ही रेसिपी बनवा.

Alu Vadi Recipe | Google

सोपी रेसिपी

अळूच्या पानांपासून बनवलेली ही वडी चवीला झणझणीत आणि खुसखुशीत लागते. घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार करू शकता.

Alu vadi | google

साहित्य

अळुच्या पानांच्या वडी बनवण्यासाठी अळुची ताजी पाने, बेसन पीठ. तांदळाचे पीठ, ओवा, हळद, मसाला, हिंग, आले- लसूण पेस्ट, तेल, कोथिंबीर, मीठ हे साहित्य घ्या.

Alu Leaves

अळुची पाने स्वच्छ धुवा

अळुची वडी रेसिपी करण्यासाठी सर्वात आधी अळुची पाने स्वच्छ धुवून घ्या. पानांच्या शिरा कापून घ्या.

Alu Leaves | Canva

मिश्रण तयार करा

एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ घ्या. त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, ओवा, हळद, लाल तिखट, धने-जिरे पूड, तीळ आणि चवीनुसार मीठ घाला

Alu vadi | google

पीठ तयार करा

नंतर या मिश्रणात चिंच-गुळाचा कोळ आणि थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या.

Besan | pinterest

पानांना मसाला लावा

एक मोठे अळूचे पान पाटावर उलटे पसरवा. तयार केलेले बेसनाचे मिश्रण त्यावर हाताने किंवा चमच्याने लावा. त्यावर दुसरे पान उलट्या दिशेने ठेवा आणि त्यालाही मसाला लावा. अशी ३ ते ४ पानांची थर एकावर एक ठेवा.

Alu Vadi Recipe | Google

रोल करा

पानांच्या कडा दुमडून त्याचा घट्ट रोल तयार करा. हा रोल इडली पात्रात किंवा मोदकाच्या चाळणीत ठेवून मध्यम आचेवर १० ते १२ मिनिट वाफवून घ्या. वाफवल्यानंतर रोल पूर्णपणे थंड होऊ द्या.

Alu Vadi Recipe | Google

वडी फ्राय करा

थंड झाल्यावर या रोलचे गोल काप कापून घ्या. एका कढईत गरम तेलामध्ये अळुवडी फ्राय करा.

Alu Vadi Recipe | Google

NEXT: गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी; ताटात वाढताच सगळेच ताव मारतील

Vaghatyachi Bhaji Recipe
येथे क्लिक करा...