Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सिंगापूरमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
प्राजक्ता सध्या हास्यजत्रेच्या टीमसोबत सिंगापूरमध्ये आहे.
प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच प्राजक्ताने सिंगापूरमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली आहे.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर अवघ्या काही मिनिटांचं लाईव्ह केलं होतं. या लाईव्हमधून तिने 'प्राजक्ताराज'चे नव्या दागिन्याची घोषणा केली आहे.
'प्राजक्ताराज' मधील नवा दागिना तिने युनिव्हर्सल स्टुडिओमधून लाँच केला.
'मोकळ्या घसाची वज्रटीक' हा दागिने तिने आज लाँच केला आहे.
हा दागिना म्हाळसा कलेक्शनमधील आहे.
प्राजक्ताने जानेवारी २०२३ मध्ये नवीन ज्वेलरी ब्रँड लाँच केला आहे. यामध्ये अनेक मराठमोळे अलंकार आहेत.