Chetan Bodke
‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा कायमच चाहत्यांमध्ये आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतंच अभिनेत्रीने ‘आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड’ या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
यावेळी अभिनेत्रीला ‘द केरला स्टोरी’ चित्रपटानिमित्त ‘बेस्ट ॲक्ट्रेस क्रिटीक्स अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अभिनेत्रीने चित्रपटामध्ये साकारलेल्या अभिनयाचं आजही चाहते तोंडभरून कौतुक करताना दिसतात.
यावेळी पुरस्कार सोहळ्याला अदाने फिकट गुलाबी रंगाचा स्टायलिश लेहेंगा परिधान करीत सुंदर फॅशन केली.
अदाच्या ह्या स्टायलिश अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याचे सर्वत्र कौतुक करीत आहे.
फोटोमध्ये, अदाचा साधा लूक, निखळ सौंदर्य आणि लूकला साजेसा मेकअप करत तिने आपला लूक केलाय.
ग्लॉसी मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने आपला फॅशन केली आहे.