ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्ही महाराष्ट्र राज्यात फिरण्याचा प्लान करत असाल तर या प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या.
मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह आणि जुहू बीच येथील प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्या शहरात फिरण्यासाठी अनेक किल्ले आणि हिल स्टेशन्स आहेत. तुम्ही येथे शिवनेरी किल्ला, सिंहगढ तसेच शनिवार वाडा पाहू शकता.
मुंबई पुण्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या लोणावळा हिल स्टेशन प्रसिद्ध आहे. येथील भुशी डॅम आणि कार्ला गुफा पर्यटकांना आकर्षित करतात.
महाबळेश्वर एक हिल स्टेशन असून हे धबधब्यांसाठी आणि स्ट्रॅाबेरीच्या फार्मसाठी प्रसिद्ध आहे.
पहिल्याचे औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर अंजठा आणि एलोरा लेणीसाठी विश्वप्रसिद्ध आहे.
नाशिकमध्ये १२ ज्योर्तिलिंगपैकी एक ज्योर्तिलिंग म्हणजेच त्रंब्यकेश्वर मंदिर आहे.