ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात फिरण्यासाठी अनेक ऐतिहासिक, सुंदर, शांत आणि प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
अरबी समुद्राजवळ असलेले गेटवे ऑफ इंडिया हे एक मुंबईतील ऐतिहासिक स्मारक आहे. येथे जगभरातून लाखो पर्यटक येतात.
मुंबईतील सर्वात सुंदर आणि शांत ठिकाणामध्ये मरीन ड्राइव्हचा समावेश आहे. येथून तुम्ही सूर्यास्त पाहण्याचा सुंदर अनुभव घेऊ शकता.
अंजिठा लेणी आणि एलोरा लेणीचा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश आहे. येथे तुम्ही, बोद्ध जैन आणि हिंदू धर्माच्या कोरलेली प्राचीन शिल्पचित्रे आणि मंदिर पाहायला मिळतील.
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शांत आणि प्रसिद्ध ठिकाण म्हणजे लोणावळा आणि खंडाळा हिल स्टेशन. नैसर्गिक सुंदरताने नटलेल्या या ठिकाणी भेट द्यायला विसरु नका.
थंड वातावरण, सुंदर निसर्ग आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर हिल स्टेशन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
जर तुम्हाला शांत आणि सुंदर समुद्रकिनारी निवांत वेळ घालवायचा असेल तर अलिबागला नक्की भेट द्या. येथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद घेऊ शकता.