Shreya Maskar
भारतात चेरापुंजी येथे सर्वाधिक पाऊस पडल्याचे बोले जाते. मात्र चेरापुंजी पेक्षाही जास्त पाऊस भारतातील एका ठिकाणी पडतो.
चेरापुंजी हे मेघालयमधील सुंदर ठिकाण आहे. येथे निसर्गरम्य दृश्य, धबधबे पाहायला मिळतात.
Hello महाराष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतात सर्वाधिक पाऊस पाथरपुंज गावात पडतो. अशी माहिती देणारा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
व्हिडीओत सांगितल्यानुसार, 2019पासून हवामान विभाग जे पावसाची नोंद करतो. त्यात असे आढळून आले की, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाथरपुंज गावात सर्वाधिक पाऊस पडतो.
पाथरपुंज गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे.
पावसाळ्यात पाथरपुंज गावात डोंगरांवर धुक्याची चादर पाहायला मिळते. पावसाळ्यात या ठिकाणाला आवर्जून भेट द्या.
साताऱ्याहून पाटण तालुक्याला जाण्यासाठी तुम्हाला बस किंवा खाजगी वाहनाने उपलब्ध आहेत.
पाटणला उतरून तेथील स्थानिक लोकांशी संपर्क साधून रस्ते आणि मार्गांची माहिती घ्यावी. येथे जाणे थोडे अवघड आहे.