शेतातील माती, दगड-धोंडे खोदण्यास रॉयल्टी आणि परवानगी लागते? काय आहेत नियम?

Bharat Jadhav

कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई?

नवीन नियमांची पायमल्ली करून विनापरवाना दगड उत्खनन करणे किंवा नियमांचे उल्लंघन करून मातीची इतरत्र विल्हेवाट लावणे या गंभीर बाबी आहेत. अशा प्रकरणांमध्ये महसूल आणि खाण विभागाकडून संबंधित व्यक्ती किंवा विकासकावर दंडात्मक कारवाई केली जाते.

Maharashtra Soil Excavation Rules Is Royalty Required for Soil and Stone

कोणत्या भूखंडासाठी कोणती प्रक्रिया पाळायची?

शेतजमिनीचे सपाटीकरण व मातीचा तेथेच वापर - रॉयल्टी व परवानगीची गरज नाही. बिगरशेती भूखंड (एनए) मातीचा तेथेच वापर करायचा असेल तर पूर्वपरवानगी घेणे आवश्यक. औद्योगिक व व्यावसायिक भूखंडातील मातीचा वापर महसूल विभागाच्या नियमांनुसार नोंद व परवाना प्रक्रिया आवश्यक आहे. दगड उत्खनन (सर्व प्रकारच्या भूखंडांवर) रॉयल्टी भरणे आणि परवाना घेणे अनिवार्य आहे.

Maharashtra Soil Excavation Rules Is Royalty Required for Soil and Stone

दगडासाठी परवाना आणि रॉयल्टी भरावी लागणार

दगडाच्या बाबतीत शासनाने कोणतीही सूट दिलेली नाही. भूखंडाचा विकास करताना किंवा पाया खोदताना जर दगड निघत असेल आणि तो त्याच भूखंडावरील बांधकामासाठी वापरला जाणार असेल, तरीही रॉयल्टी भरणे आणि महसूल विभागाचा कायदेशीर परवाना घेणे आवश्यक.

Maharashtra Soil Excavation Rules Is Royalty Required for Soil and Stone

गौण खनिजाच्या वापराच्या अटी स्पष्ट

भूखंडाचे सपाटीकरण करताना निघणारी माती किंवा मातीसदृश रेती जर त्याच भूखंडावर वापरली जाणार असेन तर त्याला रॉयल्टी नसेल. मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही प्रशासकीय अर्टीचे तंतोतंत पालन करणे जमीनमालक किंवा विकासकासाठी बंधनकारक.

Maharashtra Soil Excavation Rules Is Royalty Required for Soil and Stone

शेतातील माती तेथेच वापरली तर...

शेतजमिनीची सुधारणा करताना, सपाटीकरण करताना किंवा शेततळे खोदताना जी माती निघते, ती जर त्याच शेतात किंवा शेतजमिनीच्या विकासासाठी वापरण्यात आली, तर त्यासाठी रॉयल्टी किंवा विशेष परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

Maharashtra Soil Excavation Rules Is Royalty Required for Soil and Stone

बिगरशेती भूखंडासाठी मात्र परवानगी हवी

एनए भूखंडांच्या बाबतीत नियम थोडे वेगळे आणि शिस्तबद्ध ठेवण्यात आले आहेत. बिगरशेती भूखंडाचा विकास करताना किंवा लेआउट तयार करताना निघणारी माती त्याच भूखंडावर वापरली जाऊ शकते.परंतु त्यासाठी संबंधित यंत्रणेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक ठरते.

Maharashtra Soil Excavation Rules Is Royalty Required for Soil and Stone

हेही वाचा

येथे क्लिक करा

Agricultural Loan: १ बिघा शेतजमीन असेल तर किती कर्ज मिळू शकते?