ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गणेशोत्सवासोबतच सर्वजण गोड गोड मोदक कधी खायला मिळणार याची वाट पाहत असतात.
मोदक खाल्ल्याने जिभेला आनंद तर मिळतोच पण याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
लाडक्या गणूला प्रिय असलेले मोदक गुळ, खोबरं, तूप, तांदळाचे पिठ यांसारख्या पौष्टिक पदार्थांनी बनवले जातात.
गुळामध्ये मोठ्याप्रमाणात लोह असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
गुळामुळे शरिराला ऊर्जा मिळते. पावसाच्या दिवसांत अधिक फायदेशीर ठरते.
खोबऱ्यामध्ये असलेले कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हाडांना मजबूती देतात.
यामध्ये सौम्य गुणधर्माचे तूप वापरले जाते. ज्यामधील उपयुक्त चरबी मेंदूचे आरोग्य सुधारते. मानसिक शांतता मिळते.
मोदक बनवण्यासाठी तांदळाचे वाफवलेले पीठ वापरले जाते. जे पचण्यास सोपे असते. त्यातील कर्बोहायड्रेट्स शरिराला ऊर्जा देतात.
यामध्ये चवीसाठी वेलची आणि जायफळ घातलं जातं. जे सर्दी-खोकला असल्यास उपयुक्त ठरतं