Vishal Gangurde
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून येणारी बारावीचा परीक्षा उद्या बुधवारपासून सुरु होणार आहे.
महामुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतील. विद्यार्थ्यांनो ही परीक्षा द्यायला जाताना काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा.
परीक्षेदरम्यान जागरण करणे टाळावे. झोपेच्या वेळेत अभ्यास आणि अभ्यासाच्या वेळेत झोप घेतल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
परीक्षेच्या काळात टीव्ही,मोबाईल, वादविवाद या गोष्टीत पडू नका.
परीक्षेसाठी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रामध्ये हजर राहा.
परीक्षेला जाताना ओळखपत्र, दोन तीन पेन, कंपास, पाण्याची बॉटल, घड्याळ रुमाल सोबत ठेवा.
परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकांच्या सूचनांचे पालन करा. उत्तर पत्रिका हातात दिल्यानंतर त्यावर बैठक क्रमांक, स्वाक्षरी, तारीख, माध्यम या बाबी व्यवस्थित नमूद करा.
पेपर सोडवून झाल्यानंतर पेपरमधील चुकांचा विचार करू नका.