महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? ज्यासाठी मराठ्यांनी लढली पहिली 'मैदानी लढाई’

Bharat Jadhav

जागतिक वारसा स्थळांचा दर्जा

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी साम्राज्याशी निगडीत बारा किल्ल्यांना युनेस्को'तर्फे जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला. यात या किल्ल्याचा समावेश आहे.

salher fort

महत्त्वाचा किल्ला

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेला साल्हेर किल्ला मराठा साम्राज्यातील सर्वात महत्त्वाचा किल्ला आहे.

गडावर पाहण्यासारखी ठिकाणे

गडाच्या शिखरावर परशुरामाचे प्राचीन दगडी मंदिर आहे. गडावर गंगासागर तलाव आणि अनेक नैसर्गिक गुहादेखील आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी चार मुख्य प्रवेशद्वारे आहेत. त्यांची नावे गणेश, हनुमान, कोकण, आणि त्र्यंबक दरवाजा. सालोटा किल्ला देखील पाहण्यासाराखा आहे.

वैशिष्ट्यपूर्ण साल्हेरचा किल्ला

समुद्रसपाटीपासून उंची १५६७ मीटर( सुमारे ५,३०० फूट). कळसुबाई शिखरानंतर सर्वात उंच आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्तुंग व देशातील क्रमांक दोनचा उंच दुर्ग. वाघांबे दरवाजाकडे जातांना १६ कोरीव लेणी. मात्र त्यात मूर्ती-शिल्प नाहीत.

किल्ल्याची पौराणिक कथा

रामायणातील संजिवनी बूटी आणताना हनुमानाने हा डोंगर उचलला होता, अशी अख्यायिका आहे. तसेच भगवान परशुराम यांनीही येथे तपश्चर्या केली होती, असेही मानले जाते.

साल्हेरचं ऐतिहासिक युद्ध

फेब्रुवारी १६७२ मध्ये मराठा साम्राज्य आणि मुघल साम्राज्य यांच्यात युद्ध झाले. हे मराठ्यांचे मुघलांविरुद्धचे पहिलेच मोठे आणि समोरासमोर युद्ध झाले होते. ज्यामध्ये मराठ्यांनी मुघलांचा दारुण पराभव केला. मराठे पहिल्यांदा मैदानी लढाई लढले.

साल्हेर आणि मुल्हेर मिळण्यासाठी युद्ध

शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले जिंकले होते. हे किल्ले परत मिळवण्यासाठी मुघल सम्राट औरंगजेबाने इखलास खान आणि बहलोल खान यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २० ते ४० हजारांची मोठी फौज युद्धासाठी पाठवली होती.

एक दिवस चालले युद्ध

सरसेनापती प्रतापराव गुजर यांना वरघाटातून आणि पेशवे मोरोपंत पिंगळे यांना कोकणातून साल्हेरकडे मुघलांवर दुतर्फा हल्ला करण्यासाठी पाठवले. या युद्धात मराठ्यांचा ऐतिहासिक आणि निर्णायक विजय झाला.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Devgiri Fort: ७५० पायऱ्या अन् मगरींचा पहारा; महाराष्ट्रातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे हा किल्ला