Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री शिवाली परबला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली. शिवाली परबला कल्याणची चुलबुली म्हणून ओळखले जाते.
शिवालीने नुकतेच वेस्टन लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिने Beige रंगाचा सुंदर वेस्टन ड्रेस परिधान केला आहे. तिचे सौंदर्य कमाल आहे.
लूकला मॅचिंग मोत्यांची स्टायलिश ज्वेलरी परिधान केली आहे. थोडा बीची लूक केला आहे. तशा प्रकारे ज्वेलरी घातली आहे.
मिनिमल मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने हा लूक पूर्ण केला आहे. तिच्या फोटोंमधील कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
शिवाली परब सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. भन्नाट फोटोशूट, डान्स व्हिडीओ तसेच कॉमेडी व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांचे चांगले मनोरंजन करते.
शिवालीने फोटोंना खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "पदर्ए में रहने दो, पदर्आ न उठाओ...पदर्आ जो उठ गया तो भेद खुल जायेगा..."
"शिवाली तू लय सुंदर दिसतेस... तू माझी मराठी इंडस्ट्रीतील क्रश...", "क्यूट-स्वीट शिवा, "अति सुंदर...", "क्यूटनेस ओव्हरलोड", "कडक! तू माझी आवडती lady..." आणि "मला तुमची आठवण येते..." अशा कमेंट्स केल्या आहेत.
शिवाली परब मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करते. अनेक कार्यक्रमांमध्ये ती पाहायला मिळते. चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.