ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खूप मोठं नाव आहे.
अजित पवार हे सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत.
अजितदादा कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेत आहे.
अजित पवारांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी देवळाली प्रवरा येथे झाला.
अजित पवारांनी शालेय शिक्षणदेखील देवळाली प्रवरा येथून पूर्ण केले.
अजित पवार कॉलेजमध्ये असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्यांनी शिक्षण सोडले.
यानंतर अजित पवारांचा राजकीय प्रवास सुरु झाला.
अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय कारकिर्द सुरु केली.