Manasvi Choudhary
आज महाराष्ट्र दिन आहे त्यानिमित्त तुम्हीच घरीच महाराष्ट्राचा प्रसिद्ध मेन्यू झुणका आणि भाकर बनवू शकता.
झुणका- भाकरी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता.
झुणका बनवण्यासाठी तुम्हाला बेसन, तेल, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिंग, लाल मसाला, मीठ आणि कोथिंबीर हे साहित्य घ्यायचे आहेत.
सर्वातआधी गॅसवर तुम्हाला कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी द्या.
नंतर या मिश्रणात बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला आणि गुलाबी रंगाचा होईपर्यंत चांगला परतून घ्या.
कांदा चांगला परतला की त्यात हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करा. मिश्रणात बेसन पीठ मिक्स करा.संपूर्ण मिश्रण एकजीव करा.
बेसनामध्ये थोडे थोडे गरम पाणी घाला आणि नीट हलवा. झुणका कोरडा हवा असेल तर पाणी कमी वापरा.
सर्वातआधी तांदळाचे पीठ आणि पाणी मिक्स करून पीठ चांगले मळून घ्या. नंतर या पिठाचे गोळे करून गोलाकार आकारात थापा. नंतर गॅसवर तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्या.