Manasvi Choudhary
राज्यात बालविवाह करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
बालविवाह थांबण्यासाठी आता राज्यसरकारने नवीन नियम आणला आहे.
नवीन नियमानुसार लग्नपत्रिकेवर वधू- वराची जन्मतारिख असणे अनिवार्य केले आहे.
एकीकडे देशात AI तंत्रज्ञानात आणि विविध क्षेत्रांमध्ये मुली अव्वल ठरत असताना, दुसरीकडे त्याच मुलींच्या बालविवाहाचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.
यासाठी 'महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण' आयोगाने राज्य सरकारला लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख नमूद करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी बाल विवाह केले जातात. यासाठी बाल विवाह आणि बाल लैगिंक शोषण रोखण्यासाठी राज्यभरात जनजागृती मोहिम सुरू केली आहे.