Manasvi Choudhary
मराठी, हिंदी सिनेमासृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्कारासाठी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरुपाच्या ते खलनायक अशा अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांना दाखवल्या.
80 ते 90 च्या दशकातील मराठी सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अशोक सराफ यांचं नाव घेतलं जातं.
अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला, दक्षिण मुंबईतील चिखलवाडी येथे त्यांचं बालपण गेलं.
लहानपणापासूनच नाटकांची आवड असल्याने 18 वर्षाचे असताना त्यांनी ययाती आणि देवयानी या नाटकांतून रंगभूमीवर पदार्पण केलं.
नाटक, सिनेमे, मालिका आणि जाहिरातींमध्ये अशोक सराफ यांनी काम केले आहे.
अशोक सराफ यांची एकूण संपत्ती ३७ कोटी असल्याचे बोललं जातं आहे.