ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतातील सर्वात समृद्ध आणि सुंदर राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश आहे. येथे फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत.
महाराष्ट्रात भेट देण्यासाठी एक नाही तर अनेक भव्य आणि आश्चर्यकारक ठिकाणं आहेत.
महाराष्ट्रातील कॅम्पिंग आणि रॉक क्लाइंबिंगचा आनंद घेण्यासाठी लोणावळा हिल स्टेशन प्रसिद्ध आहे.
ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी, महाराष्ट्रातील माथेरान हिल स्टेशनला नक्कीच भेट द्या. हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे.
ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि रॉक क्लाइंबिंग सारख्या अॅक्टीव्हिटीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील पाचगणी हिल स्टेशनला भेट देण्याची योजना आखू शकता.
जर तुम्हाला महाराष्ट्रातील धबधबे आणि सरोवरांसह मंदिरांना भेट द्यायची असेल तर तुम्ही महाबळेश्वर हिल स्टेशनला भेट देऊ शकता. महाबळेश्वर एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे.
महाराष्ट्रातील चिखलदरा हिल स्टेशन त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय, तुम्ही येथे काही साहसी अॅक्टीव्हिटीचा आनंद घेऊ शकता.