ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही भारतीय मिठाईंमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. सणासुदीला तुम्ही हमखास या मिठाईंचे सेवन करु शकता. यामध्ये कोणकोणत्या मिठाईंचा समावेश आहे. जाणून घ्या.
खजूर आणि ड्राय फ्रुट्स बर्फी एक नॅचरल गोड मिठाई आहे. यामध्ये खजूर, बदाम आणि अक्रोड असल्यामुळे ही एक हेल्दी मिठाई आहे. यामध्ये साखर किंवा तेल वापरले जात नाही.
बेसन आणि तूपापासून बनवला जाणारा बेसन लाडूमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. तसेच बेसन लाडू खालल्याने उर्जा देखील मिळते.
चवीला समृद्ध असला तरी, कमी तूप आणि गूळाचा वापर केल्याने हा एक हेल्दी पर्याय आहे.
तांदळाचे पीठ, नारळ आणि गूळ वापरून, तयार केलेले उकडीचे मोदकमध्ये कमी कॅलरीज असतात. म्हणून हा एक हेल्दी पर्याय आहे.
कमी साखर आणि काजूपासून तयार करण्यात येणारी काजू कतली मिठाई एक हेल्दी पर्याय आहे. तसेच यामध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील कमी असते.
जर तुम्हाला काही गोड खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही रसगुल्ला बिनधास्त खाऊ शकता. दूधापासून बनवण्यात येणारी या मिठाईमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते.