ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाणं आहेत. याशिवाय येथे स्वर्गाहूनी सुंदर हवेची ठिकाणं देखील आहेत.
जगभरातून अनेक पर्यटक महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी येतात. तुम्हीही येथे भेट द्यायला विसरु नका.
पुणे- मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लोणावळा हिल स्टेशनला नक्की भेट द्या. येथे तुम्ही रॉक क्लाइम्बिंग, कॅम्पिंग सारख्या अनेक अॅक्टिव्हिटिजचा आनंद घेऊ शकता.
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनमध्ये माथेरानचा समावेश केला जातो. येथे तुम्ही ट्रेकिंग, हायकिंग करु शकता.
महाराष्ट्राचे स्वित्झर्लंड म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर हिल स्टेशनला नक्की भेट द्या. येथे स्ट्रॉबेरी फार्मिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंगसह तुम्ही बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकता.
महाबळेश्वरपासून काही अंतरावर पाचगणी हिल स्टेशन वसलंय. येथील मनमोहक दृश्ये तुमच्या मनाला भुरळ घालतील.
नागपूरपासून काही अंतरावर चिखलदरा हिल स्टेशन आहे. येथे वाइल्ड लाइफ सफारीसह निसर्गरम्य दृश्ये आणि शांत वातावरणाचा आनंद घेऊ शकता.