ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
संजय पांडुरंग शिरसाट हे एक भारतीय राजकारणी आहेत.
संजय शिरसाट हे राजकीय पक्ष शिवसेनेचे सदस्य आहे.
संजय शिरसाट यांनी सलग तीनवेळा छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिल्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्जात पाच वर्षात दहापट वाढ झाल्याचे जाहीर केले.
पाच वर्षात संजय शिरसाट यांची संपत्ती ३ कोटी ३१ लाखांवरुन तब्बल ३३ कोटी ३ लाखांवर गेली आहे.
आज सध्या संजय शिरसाट यांच्याकडे ४४ लाख ७८ हजार रोकड आहे.
संजय शिरसाट यांच्यावर विविध बँकाचे २६ कोटी ४५ लाख ७५ हजार ९२२ रुपयांचे कर्ज आहे.
संजय शिरसाट यांनी शुक्रवारी दोन उमेदवारी अर्ज जाहीर केले होते.
संजय शिरसाट यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे ४ कोटी ३७ लाख ६० हजार ७६१ रुपये किमतीची शेत जमीन आणि ४ कोटी ७० लाख ४५ हजार ८६० रुपयांचे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर शहरात फ्लॅट असण्याचे नमूद केले आहे.
NEXT: दररोज धावताना 'या' चूका करणे टाळा