ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या शरीरासाठी मॅार्निंग वॅाक आणि धावणे एक उत्तम व्यायाम आहे.
दररोज धावल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळत असतात.
मात्र धावत असताना काही चुका केल्या तर, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.
कधीही धावत असताना या चूका करु नका.
नेहमी धावताना चुकीचे फुटवेअर निवडू नका. यामुळे तुमच्या शरीराच्या पाय, गुडघे, आणि सांध्यावर परिणाम होऊ शकतो.
धावण्याचा आधी नियमितपणे वॅार्मअप करणे गरजेचे आहे. याबरोबर शरीरासाठी थोडे स्ट्रेचिंग देखील आवश्यक आहे.
दररोज धावताना आपल्या शरीराची योग्य स्थिती असणे फार महत्त्वाचे आहे.
जास्त धावल्यामुळे आपल्या शरीरावर आणि सांध्यावर दबाव येऊ शकतो.
शरीराला आराम न देता धावल्यामुळे आपले सांधे कमजोर होऊ शकतात आणि गंभीर इजा देखील होऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: मोड आलेल्या मेथीचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या