ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या आरोग्यसाठी मेथीचे दाणे किंवा मेथीची हिरवीगार भाजी खूप फायदेशीर असते.
याबरोबर मोड आलेल्या मेथीचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत.
मोड आलेल्या मेथीमध्ये आवश्यक जीवसत्त्व,खनिजे, आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.
मोड आलेल्या मेथीमध्ये उच्च फायबर असल्यामुळे ते आपल्या शरीराच्या पचनक्रियेला चांगले ठेवण्यास मदत करतात.
आरोग्यदायी मोड आलेली मेथी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी मोड आलेली मेथी खूप फायदेशीर आहे.
मोड आलेली मेथी अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी- इंफ्लेमेटरी कंपाऊडने परिपूर्ण असल्याने, आपल्या शरीरातील सूज कमी करण्यास फायदेशीर असतात.
मोड आलेली मेथी कोलेस्ट्रॅालची क्षमता कमी करण्यास मदत करत असतात. याबरोबर हृदयविकारापासून बचाव करतात.
रोज आहारात मोड आलेली मेथी खाल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
NEXT: अपूर्वा गोरेचं सुंदर सौंदर्य, फोटो पाहा