Manasvi Choudhary
पिलोजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जिउबाई अथवा राजसबाई म्हणजेच महाराणी येसूबाई साहेब होय.
महाराणी येसूबाई ह्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या.
मराठी साम्राज्यासाठी महाराणी येसूबाई यांनी मोठे योगदान दिलं आहे.
महाराणी येसूबाई मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ सूनबाई होत्या.
येसूबाईंचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांसोबत १६६६ साली झाला.
वयाच्या ६ ते ७ वर्षात लग्न झाल्यामुळे त्यांच्या आयुष्याची जडणघडण ही मासाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली झाली.
छत्रपती शिवरायांच्या अनुपस्थिति मासाहेब जिजाऊ संपूर्ण राज्यकारभार सांभाळायच्या त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत महाराणी येसूबाई स्वराज्याची धुरा सांभाळत असत.