Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीजवळ महादेवगड हे प्रसिद्ध पॉईंट आहे. येथे हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर, धबधबे, नागमोडी वळणाचे रस्ते आणि थंड हवामान अनुभवता येते.
महादेवगड ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. कारण तिथे घनदाट हिरवळ, विविध वनस्पती, पक्षी आणि ऐतिहासिक किल्ला आहे.
महादेवगड पॉईंटवरून सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण किनारपट्टीचे विहंगम दृश्य दिसते.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात महादेवगडला आवर्जून भेट द्या. फोटोशूटसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
महादेवगड पॉईंटवरून सूर्यास्त सुंदर नजारा पाहायला मिळतो. पर्यटक विशेषता हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येथे गर्दी करतात.
महादेवगडजवळ भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. इथून आंबोली घाटाचे विहंगम दृश्य दिसते.
महादेवगडला जाण्यासाठी सावंतवाडी रोड हे रेल्वे स्टेशन जवळचे आहे. येथून तुम्ही रिक्षा- बसने महादेवगड या सुंदर लोकेशनला पोहचाल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.