Shreya Maskar
महादेव गड किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली येथील एका टेकडीच्या माथ्यावर वसलेला आहे. हे एक अत्यंत सुंदर, फारसे प्रसिद्ध नसलेले प्राचीन शिवमंदिर आणि निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ आहे.
पश्चिम घाटातील घनदाट आणि हिरव्यागार दऱ्यांच्या चित्तथरारक , विहंगम दृश्यांसाठी महादेव गड किल्ला ओळखला जातो. आंबोली हिल स्टेशनला गेल्यावर येथे नक्की भेट द्यायला जा.
2080 फूट उंचीवर स्थित असलेल्या या ठिकाणावरून दऱ्यांचे चित्तथरारक दृश्य पाहायला मिळते. जेथे हिरवळ दिसते. वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
महादेव गड किल्ल्यावर एका लहान गुहेत भगवान शंकराचे मंदिर आहे. ज्यामुळे हे ठिकाण ध्यानधारणा आणि आत्मचिंतनासाठी अत्यंत लोकप्रिय ठरले आहे.
धुक्याने आच्छादलेल्या टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर सूर्यास्ताचे भव्य आणि सुंदर रूप दिसते. येथे गेल्यावर किल्ल्याच्या उरलेल्या दगडी तटबंदी आणि वास्तूंचे अवशेष येथे पर्यटकांना पाहता येतात.
आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे. मुसळधार पावसासाठी, मनमोहक धुक्याच्या दऱ्यांसाठी, आंबोली धबधबा यांसाठी हे प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
आंबोली हिल स्टेशनवरून महादेव गड साधारणपणे २ ते ३ किमी अंतरावर आहे. तुम्ही येथे रिक्षाने किंवा बसने जाऊ शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.