Dhanshri Shintre
उन्हाळ्यात पर्यटनासाठी अनेक पर्यटक शिमला-मनाली आणि केरळसारख्या थंड आणि निसर्गरम्य ठिकाणांना प्राधान्य देतात.
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा अप्रतिम हिल स्टेशनची माहिती देणार आहोत, जिथलं सौंदर्य शिमला-मनालीलाही मागे टाकेल.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे हिल स्टेशन आपल्या अप्रतिम दृश्ये आणि निसर्गसौंदर्यासाठी खास ओळखले जाते.
महाबळेश्वरमध्ये पाहण्यासाठी अनेक आकर्षक ठिकाणं आहेत, ज्यामध्ये लिंगमाला धबधबा आणि प्राचीन महाबळेश्वर मंदिर हे सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटनस्थळं मानले जातात.
हिरवाईने नटलेल्या निसर्गात बोटिंगचा अनुभव घ्यायचा असेल, तर वेण्णा तलाव हे एक उत्तम आणि रम्य ठिकाण आहे.
महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर निसर्गरम्य दृश्यांचा मनमुराद आनंद घेता येतो; संध्याकाळची शांतता आणि सौंदर्य पाहून पर्यटक भारावून जातात.