ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध फिरण्याचे ठिकाण आहे.
महाबळेश्वर येथील काही अंतरावर नैसर्गिक सौंदर्यांने नटलेले एक हिल स्टेशन आहे. जर तुम्ही महाबळेश्ररला फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर या ठिकाणी नक्की जा.
महाबळेश्वरजवळ वसलेल्या या सुंदर हिल स्टेशनचे नाव पाचगणी आहे.
पाचगणीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. येथील शांत वातावरण आणि मनमोहक दृश्ये तुमची सहल अविस्मरणीय करतील.
या हिल स्टेशनच्या टेकड्या पर्यटकांना आकर्षित करतात. या टेकड्या अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय आहेत.
महाबळेश्वर वसलेल्या या हिल स्टेशनवर पर्यटकांना आपण ढगांमधून चालण्याचा भास होतो.
महाबळेश्वरपासून पाचगणी हिल स्टेशन सुमारे १९.८ किलोमीटर अंतरावर आहे.
येथे उन्हाळ्यात स्ट्रॅाबेरी फेस्टिव्हल देखील आयोजित केला जातो.