Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंडीत केस कोरडे होतात केसांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
केसांची गळती थांबवण्यासाठी, केस काळेभोर करण्यासाठी आणि कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही घरीच तेल बनवू शकता.
स्वयंपाकघरातील कढीपत्ता, कांदा आणि कोरफड यांचा तेल केसांना लावल्यास फायदा होतो.
तेल बनवण्यासाठी सर्वात आधी कोरफडचे बाजूचे काटे छोटे तुकडे करून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या आणि कढीपत्ता नीट वाळवून घ्या
गॅसवर कढईत खोबरेल तेल गरम करा त्यात मेथी दाणे, कांदा, कोरफड आणि कढीपत्ता मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण चांगले परतून घ्या आणि हे तेल होईपर्यत मिश्रण होऊद्या. यानंतर तेल पूर्णपणे थंड करा
थंड झालेले तेल सुती कापडाने किंवा गाळणीने गाळून घ्या एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा.