Manasvi Choudhary
प्रत्येक महिलेचे स्वप्न म्हणजे पैठणी साडी. पैठणी साडीविषयी महिलांना वेगळचं प्रेम आणि आकर्षण आहे.
पैठणी साडी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा जपते. हाताने विणलेली रेशमी पैठणी साडी नक्षीकाम आणि नैसर्गिक रंगासाठी प्रसिद्ध आहे.
बांगडी मोर हा पैठणीतील सर्वात जुना आणि रॉयल प्रकार आहे. पदरावर बांगडीच्या आकाराच्या गोल नक्षीमध्ये चार मोर विणलेले असतात.
मुनिया ब्रोकड या साडीच्या काठावर पोपटाची नक्षी असते. ही साडी दिसायला अतिशय आकर्षक आणि पारंपारिक असते.
यात ताणा आणि बाणा एकाच रंगाचा असतो. ही विणायला सोपी पण दिसायला अत्यंत नाजूक असते.
आधुनिक काळात ही खूप लोकप्रिय आहे. यात साडीचा काठ सोन्याच्या किंवा चांदीच्या जरिचा असतो, ज्यामुळे साडीला लक्झरी लूक असतो
असावरी डिझाईन पैठणी साडी फुलांच्या वेली आणि पानांची नक्षी असते. हे डिझाइन पेशवे काळात खूप प्रसिद्ध होते.