Shreya Maskar
मॅगी मसाला बनवण्यासाठी जिरे, काळी मिरी, दालचिनी, लवंगा, हळद, लाल मिरची पावडर , धणे पावडर, सुक्या लाल मिरच्या,लसूण पावडर आणि कोथिंबीर इत्यादी मसाले लागतात.
बडीशेप, वेलची, आमचूर पावडर , साखर ,मीठ आणि कांदा पावडर इत्यादी पदार्थ लागतात.
मॅगी मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये जिरे, धणे आणि बडीशेप टाकून भाजून घ्या.
त्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये काळी मिरी, सुकी लाल मिरची, लवंगा, दालचिनी आणि वेलची तळून घ्यावी.
मसाले थंड झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून घ्या.
त्यानंतर वाटलेला मसाला बाऊलमध्ये टाकून त्यात हळद, तिखट, कांदा पावडर, लसूण पावडर आणि आमचूर पावडर मिक्स करा.
आता हा मसाला हवा बंद डब्यात भरून ठेवा.
कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी तुम्ही घरगुती मॅगी मसाल्याचा वापर करू शकता.