Shruti Vilas Kadam
‘माँ बहन’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितने खास डेनिम फॅब्रिकपासून तयार केलेली साडी परिधान केली. या अनोख्या लूकमुळे ती पुन्हा एकदा फॅशनप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरली.
डेनिमच्या मॉर्डन फॅब्रिकला पारंपरिक साडीच्या रूपात नेसून माधुरीने फॅशनला नवा लूक दिला. तिचा हा लूक ट्रेंडी आणि एलिगंट वाटत होता.
साडीच्या पदरावर आणि बॉर्डरवर गुलाबी, हिरव्या व मेटॅलिक धाग्यांनी केलेली फ्लोरल एम्ब्रॉयडरी संपूर्ण लूकला अधिक आकर्षक बनवत होती.
या साडीसोबत माधुरीने भरजरी एम्ब्रॉयडरी असलेला टिश्यू ब्लाऊज परिधान केला होता. ब्लाऊजवरील नाजूक नक्षीकामामुळे तिचा संपूर्ण लूक अधिक उठून दिसत होता.
गोल्डन इअररिंग्स, बांगड्या आणि हँडबॅगच्या मदतीने माधुरीने आपला लूक पूर्ण केला. साधेपणातही तिची स्टाइल विशेष दिसून येत होती.
सॉफ्ट मेकअप, विंग्ड आयलाइनर, ब्लश आणि छोट्याशा टिकलीसह माधुरीचे सौंदर्य अधिक खुलवलेले दिसत होते. तिच्या वेव्ही हेअरस्टाइलने लूकला चारचाँद लावले.
माधुरीचा हा डेनिम साडी लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. चाहत्यांनी तिच्या स्टाइल सेन्सचे भरभरून कौतुक करत तिला ‘टाइमलेस फॅशन आयकॉन’ म्हटले.